Home Loan: लवकरात लवकर कर्जमुक्त व्हायचंय, मग कर्जाचा कालावधी वाढवाव की EMI, काय फायदेशीर
- Asaram Mundhe
- March 1, 2023
- 12:53 pm
- No Comments
Home Loan EMI Rate: रशिया-युक्रेन युद्धानंतर बेलगाम झालेल्या महागाईवर आळा घालण्यासाठी देशभरातील केंद्रीय बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने देखील मे २०२२ पासून सहा वेळा रेपो दरात एकूण २.५०% वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयानंतर बँकांनीही व्याजदरात वाढ केली आहे, त्यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग झाली असून, कर्जदारांवर मासिक हप्त्याचा (ईएमआय) बोजा वाढला आहे.
- मे २०२२ पासून रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात ६ वेळा वाढ झाली आहे
- फेब्रुवारी २०२३ मध्ये आरबीआयने रेपो दरात २५ बेस पॉइंट्सची वाढ केली
- रिझर्व्ह बँकेचा रेपो दर ६.५० टक्क्यांवर पोहोचला आहे.
Pune : वाढत्या महागाईवर आळा घालण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीच्या पतधोरणात रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली. यानंतर मध्यवर्ती बँकेचा एकूण रेपो रेट ६.५० टक्क्यांवर पोहोचला. विशेष म्हणजे मे २०२२ पासून रेपो दरात एकूण सहा वेळा २.५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयानंतर बँकांनीही व्याजदरात वाढ केली, त्यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महागली. काही बँकांनी एका वर्षात गृहकर्जाच्या दरात १.५ ते २ टक्क्यांनी वाढ केली आहे. वेगवेगळ्या बँकांच्या गृहकर्जाची तुलना केल्यास ते सरासरी ९.५० टक्के व्याजदराने उपलब्ध आहे
बँकांचा EMI जैसे थे, पण मुदत वाढवली
गेल्या वर्षी मे महिन्यापासून रिझर्व्ह बँक व्याजदरात वाढ करत आहे. मे महिन्यापासून रेपो दर चार टक्क्यांनी वाढून ६.५०% वर पोहोचला आहे. व्याजदर वाढीचा परिणाम म्हणजे अनेक गृह कर्जदारांनी यापूर्वी भरलेला ईएमआय तसाच राहिला आहे. असं असलं तरी, जेव्हा दरात वाढ होते तेव्हा बँका तुमचा EMI वाढवत नाहीत तर कर्जाची मुदत वाढवली जाते. म्हणजेच, ईएमआय न वाढवता तुम्ही कर्जाचा कालावधी वाढवून महाग व्याजदर नियंत्रणात ठेवत आहात. असे अनेक कर्जदार आहेत, ज्यांच्यापैकी काहींनी १५ तर काहींनी २० किंवा ३० ईएमआयचा नुकसान सोसावे लागले आहे.
कर्जाचा कालावधी वाढवणे ठरेल मोठी चूक
सहसा लोक अशा चुका करतात. मासिक ईएमआय कमी ठेवण्यासाठी बरेच लोक कर्जाचा कालावधी वाढवतात. उदाहरणार्थ, २० वर्षांच्या ऐवजी कर्जाच्या कालावधीत २५ किंवा ३० वर्षांनी वाढ करतात. म्हणजे दर महिन्याला येणाऱ्या हप्त्यावर परिणाम होणार नाही, पण वाढीव कालावधीत एकूण व्याज जोडल्यास लाखांचा अतिरिक्त बोजा वाढतो. त्यामुळे कर्जाचा कालावधी वाढवण्याऐवजी EMI वाढवणे फायदेशीर आहे.
कालावधी एक सामान ठेवल्यास...
समजा तुम्ही एप्रिल २०२२ मध्ये ७.५०% दराने १५ वर्षांसाठी 50 लाखांचे गृहकर्ज घेतले. त्यानुसार तुमचा मासिक ईएमआय अंदाजे 46,350 रु. असेल. गृहकर्जाच्या पहिल्या वर्षी तुम्हाला 3,68,664 रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. पण व्याजदर आणि EMI समान राहिले असते, तर तिसऱ्या वर्षी तुमचे वार्षिक व्याज पेमेंट 3,38,378 रुपये झाले असते. म्हणजेच कर सवलतीसाठी लागू असलेल्या 2 लाख रुपयांच्या मर्यादे इतकेच आहे.
पण एप्रिल ते डिसेंबर 2022 काळात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 2.25 % वाढ केली. अशा स्थितीत जर गृहकर्जाचा दरही त्याच रकमेने वाढला असेल, तर तुमच्या नवीन गृहकर्जाचा व्याजदर 9.75 % असेल. पण जर तुमच्या गृहकर्जाची मुदत पूर्वीसारखीच राहिली, म्हणजे 15 वर्षे, तर तुम्हाला 46350 रुपयांऐवजी 52968 रुपये EMI भरावा लागेल. अशा स्थितीत 3,68,664 रुपयांऐवजी तुम्हाला एका वर्षात 4,80,695 रुपये व्याज भरावा लागेल. तर तुम्हाला फक्त २ लाख रुपयांवर सूट मिळेल.
कालावधी वाढल्यास
जर तुमच्या बँकेने कर्जाच्या हप्त्याच्या रकमेऐवजी मुदत वाढवली म्हणजे ईएमआय रु. 46,350 वर कायम ठेवल्यास व्याजदर ७.५% वरून ९.७५% पर्यंत वाढल्यास गृह कर्जाचा कालावधी १५ वर्षांवरून सुमारे २२ वर्षांपर्यंत वाढेल. असे झाल्यास, एका वर्षात तुम्हाला 3,68,664 रुपयांऐवजी 4,84,498 रुपये व्याज द्यावे लागेल, पण सूट केवळ २ लाख रुपयांवरच मिळेल.